मुंबई -गेल्या दोन दिवसांपासून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईतल्या त्यांच्या खार येथील निवास्थानी आहेत. त्यांनी आज सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर पोहचून हनुमान चालीस वाचणार असल्याचे सांगितले होते. मात्र, शिवसैनिकांच्या विरोधामुळे त्यांना घराबाहेर निघता आले नाही. दरम्यान, आता हे आंदोनल मागे घेत असल्याची घोषणा खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. रविवारी पंतप्रधान मुंबईत येणार असल्याने त्यांच्या दौऱ्यात कायदा सुरक्षेला धोका नको म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गृहमंत्र्यांनी दिला होता कारवाईचा इशारा -दरम्यान, यासंदर्भात बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, 'नवनीत राणा आणि रवि राणा हे पुढे केलेले प्यादे आहेत. त्यांच्या आडून राज्यात कायदा आणि सुवव्यस्था अबादित नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचे नाव न घेता केला. राणा दाम्पत्य आपल्या हनुमान चालीसा पठणावर ठाम असतील तर कारवाई केली जाईल, असा इशाराही वळसे पाटील यांनी यावेळी दिला होता.
काय आहे प्रकरण? -मला मुंबईत येऊन हनुमान चालीसा पठण करा, असे आव्हान देणाऱ्या शिवसैनिकांनी मला मुंबईत कधी यायचे, याची तारीख सांगावी. मी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसा पठण करायला लावणार आहे, मी स्वतः मुंबईची मुलगी असून आज विदर्भाची सून आहे. आज त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असेल, तर माझ्याकडे विदर्भाची संपूर्ण ताकद असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केले नाहीतर आम्ही हनुमान जयंती नंतर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला होता. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी राणा दाम्पत्य लपून मुंबईत दाखल झाले होते. तसेच येथे पत्रकार परिषद घेऊन आज मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा दिला होता. मात्र, शिवसैनिकांच्या विरोधामुळे त्यांना घराबाहेर निघता आले नाही. अखेर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत दोघांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले.
हेही वाचा -MLA Ravi Rana : रवी राणा यांच्या घरावर दगडफेक; FB वरून राणा यांचा गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप