मुंबई - नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि रवी राणा यांनी घरचे अन्न मिळावे ( Navneet Rana application for home food ) यासाठी केला मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Sessions Court ) अर्ज केला आहे. अर्जात राणा पती पत्नींने घरचे जेवण मिळावे अशी मागणी कोर्टाला विनंती केली आहे. उद्या सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान राज्य सरकार राणा दाम्पत्याच्या ( Rana Couple applied for home food ) अर्जावर उत्तर दाखल करणार आहे.
उद्या न्यायालयात सुनावणी - पोलिसांसोबत हुज्जत घातल्या प्रकरणात एफआयआर रद्द करावा यासाठी दाखल केलेली याचिका राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळल्यानंतर राणा दाम्पत्यांने जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र राणा दाम्पत्यांला सेशन कोर्टातही दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान त्यांनी घरचे जेवण मिळण्याकरिता केलेल्या अर्जावर देखील उद्या न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत नवनीत राणा हनुमान चालीसा पठण प्रकरणात झालेल्या घडामोडी -
राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत -हनुमान चालीसावरून राणा दाम्पत्य आणि शिवसैनिकांमध्ये मुंबईत जोरदार खडाजंगी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा लक्षात घेत राणा दाम्पत्याने माघार घेतली. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
नवनीत राणा यांचे ओम बिर्लांना पत्र - खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र लिहिले आह. या पत्रात पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मला २३ एप्रिल रोजी खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. संपूर्ण रात्र मी तिथे होते. यादरम्यान, तहान लागल्याने मी पिण्यासाठी पाणी मागितले होते. पण, ते दिले नाही. मी मागासवर्गीय असल्याने इतरजण वापरत असलेल्या ग्लासमधून तुम्हाला पाणी देता येणार नाही, असे ड्युटीवरच्या पोलिसांनी मला सांगितले. हा प्रकार माझ्यासाठी धक्कादायक होता. मला बाथरूमही वापरू दिले नाही. जातीवरून हिणवत माझा छळ करण्यात आला. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली,' असा दावा नवनीत राणा यांनी पत्रात केला आहे.