नवी मुंबई - राज्य निवडणूक आयोगाच्या ( State Election Commission ) सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत ओबीसी, ओबीसी महिला व सर्वसाधारण (महिला) आरक्षण सोडत प्रक्रियेला ( Election Reservation Release Procedure ) कडक पोलीस बंदोबस्तात पार पडली. नवी मुंबई महानगरपालिकेत ( Navi Mumbai Municipal Corporation ) आरक्षण सोडत निघाल्यानंतर महापालिकेतील अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. काही जणांचे प्रभाग आरक्षित झाल्याने आता कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवता येईल किंवा आपल्या प्रभागात कोणता उमेदवार उभा करता येईल याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
सर्वसाधारण महिला आरक्षण - एकूण 41 प्रभाग हे खुले प्रभाग असतील. त्यापैकी २१ प्रभागांचे थेट आरक्षण आहे. यात प्रभाग क्रमांक १७(अ), प्रभाग क्रमांक १३(अ), प्रभाग क्रमांक २६(अ), प्रभाग क्रमांक ३६(अ), प्रभाग क्रमांक ३(ब), प्रभाग क्रमांक ७(बी), प्रभाग क्रमांक ८(बी), प्रभाग क्रमांक ९(बी), प्रभाग क्रमांक १२(बी), प्रभाग क्रमांक १८(बी), प्रभाग क्रमांक १९(बी), प्रभाग क्रमांक २२(बी), प्रभाग क्रमांक २३(बी), प्रभाग क्रमांक २८(बी), प्रभाग क्रमांक २९(बी), प्रभाग क्रमांक ३१(बी), प्रभाग क्रमांक ३२(बी), प्रभाग क्रमांक ३४(बी), प्रभाग क्रमांक ३७(बी), प्रभाग क्रमांक ३९(बी), प्रभाग क्रमांक 35 (ब) प्रभागांचा समावेश आहे.