मुंबई-अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते वादळामुळे कोकोणासह मुंबई शहरालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परिणामी या वादळाचा प्रभाव पाहता अरबी समुद्रातील बॉम्बे हायजवळ असलेल्या हिरा ऑइल फिल्ड्स परिसरात काम करणाऱ्या 305 कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय नौसेनेने आयएनएस कोची जहाज मदतीसाठी पाठवले आहे. आतापर्यंत आयएनएस कोची वरून 177 जणांना वाचविण्यात आलेले आहे. दरम्यान वादळाची तीव्रता अधिक असून यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत. तरी आयएनएस कोची व आय एन एस तलवार या दोन्ही जहाजांकडून बचावकार्य हाती घेण्यात आल्याचे नौदलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात अडकलेल्या ३५० पैकी १७७ कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले - तौक्ते चक्रीवादळा बद्दल बातमी
अरबी समुद्रात अडकलेल्या 273 जणांना वाचवण्याचे नौदलाचे प्रयत्न सुरू आहेत. या बाबत नौदलाने माहिती दिली आहे.
![अरबी समुद्रात अडकलेल्या ३५० पैकी १७७ कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले Naval forces are trying to rescue 273 people stranded in the Arabian Sea](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11795319-thumbnail-3x2-mumbai02.jpg)
याबरोबरच भारतीय नौदलातर्फे आणखीन काही जहाजं भारताच्या पश्चिम समुद्रकिनारी तैनात करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलेला आहे. दरम्यान वादळाची तीव्रता ही अधिक असून यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत असले तरी आयएनएस कोची व आय एन एस तलवार या दोन्ही जहाजांकडून बचावकार्य हाती घेण्यात आल्याचे नौदलाकडून स्पष्ट करण्यात आलेला आहे.
मुंबईच्या दक्षिण -पश्चिम समुद्रकिनार्यापासून 70 किलोमीटर अंतरावर हे कर्मचारी अडकले आहेत. यांच्या मदतीसाठी नौदलाची आयएनएस तलवार ही सुद्धा पाठवण्यात आल्याचे नौदलातर्फे स्पष्ट करण्यात आलेला आहे. या वादळात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचण्याची पूर्ण प्रयत्न केले जात असून आतापर्यंत या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये किती कर्मचाऱ्यांना भारतीय नौदलात तर्फे वाचविण्यात आले आहे, याची अधिकृत माहिती नौदलातर्फे देण्यात आलेली नाही. मात्र, हे बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.