मुंबई- 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई शहरावर झालेल्या हल्ल्याच्यावेळी अजमल कसाब याने लपवून ठेवलेली शस्त्रास्त्र व दारुगोळा शोधण्याचे काम करणाऱ्या व मुंबई पोलीस खात्यातील कॅनिंग सैनिक ओळखल्या जाणाऱ्या नॉटी या श्वानाचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस त्यांनी मुंबई शहरात आणलेल्या शस्त्र व दारुगोळ्याचा शोध घेण्यात नॉटी या श्वानाने मोठी कामगिरी बजावली होती.
नॉटी 2014 मध्ये झाला होता सेवानिवृत्त
नॉटी हा 14 वर्षांचा होता. गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. मुंबई पोलीस खात्यातून त्याला 2014 मध्ये निवृत्त करण्यात आल्यानंतर माजी रणजीपटू राकेश सुतार यांनी त्याला दत्तक घेतले होते. 2008 ते 2014 या काळात नॉटी हा श्वान कॅनिंग सैनिक म्हणून मुंबई पोलीस खात्यात आपले कर्तव्य बजावत होता.
हेही वाचा -'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले
हेही वाचा -राष्ट्रीय पुरस्कार विजेती "तेंडल्या" चित्रपटाची टीम कर्ज फेडण्यासाठी करतेय शेती