पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली आहे. याबाबत पवार यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
Sharad Pawar Corona Positive : शरद पवार यांना कोरोनाची लागण; पवारांनी केली 'ही' विनंती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांना फोन
15:39 January 24
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली शरद पवार यांची चौकशी
13:57 January 24
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला करोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची करोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.
शरद पवारांनी केली 'ही' विनंती -
गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंती शरद पवार यांनी आपल्या ट्वीटद्वारे केली आहे.