महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

NITIE Mumbai : एनआईटीआईईचे नामांतर आता आयआयएम होणार! - निती लेटेस्ट न्यूज

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था ( National Institute of Industrial Engineering Mumbai ) अर्थात एनआईटीआईईचे ( NITIE Mumbai ) नाव आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ( IIM Mumbai ) असे करण्यात येणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात याबाबतच्या विधेयकावर चर्चा होणार आहे. यासंदर्भात शिक्षण मंत्रालयाने एक समिती ही स्थापन केली आहे.

Indian Institute of Management Mumbai
नीटीचे नामांतर आता आयआयएम होणार!

By

Published : Jul 19, 2022, 9:57 PM IST

मुंबई - राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था ( National Institute of Industrial Engineering Mumbai ) अर्थात निटी याचे नाव बदलून आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई म्हणजेच आयआयएम मुंबई ( IIM Mumbai ) असे करण्यात येणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारने एक विधेयक ही पावसाळी अधिवेशनात आणण्याचा मानस व्यक्त केला आहे. एनआईटीआईई या संस्थेच्या माध्यमातून औद्योगिक अभियांत्रिकी अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि व्यवस्थापन शास्त्राच्या क्षेत्रात विशेष कार्य केले जाते. यासंदर्भात आयआयएम कायदा 2017 अंतर्गत एक समितीची स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे 2022 मध्ये एनआईटीआईई मुंबईचा समावेश करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनातील 24 नवीन विधेयकांपैकी एक विधेयक असणार आहे.

पवई येथे ही संस्था कार्यरत राहणार - एनआईटीआईई ही संस्था मुंबईच्या पूर्व उपनगरातील पवई या तलावाजवळ सुमारे 63 एकर परिसरात आहे हा परिसर जंगलाने व्यापलेला आहे सर्व इमारतींमध्ये वीज रस्ते तटबंदी भिंत तसेच सर्व जुन्या इमारती उभ्या आहेत या इमारतींचे नूतनीकरण युद्धपातळीवर करण्याचे काम सुरू आहे या भागात उपहारगृह, सहा वस्तीगृह आणि चौदा निवासी इमारतींसह पाच कार्यालयीन इमारती उभे आहेत. या सर्व परिसराचे आता नामकरण होणार असून हा विभाग आयआयएम मुंबई या नावाने यापुढे ओळखला जाण्याची शक्यता आहे.

कोण आहे समितीत?केंद्र सरकारने यासंदर्भात स्थापन केलेल्या समितीमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलाहाबाद विद्यापीठाचे कुलपती आशिष कुमार चव्हाण हे प्रमुख आहेत तर समितीच्या अन्य सदस्यांमध्ये पवन कुमार सिंग आयआयएम तिरु चिरापल्लीचे संचालक, आयआयटी बॉम्बे चे संचालक सुभाषिश चौधरी, आय.टी.बी.एच.यु. संचालक प्रमोद कुमार जैन आणि प्रदीप मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गोयल यांचा समावेश होता. यासंदर्भात मुंबईचे संचालक सुभाषिश चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा -Udhhav Thackeray : 'कितीही बाण घेऊन जा, धनुष्य माझ्याकडेच'; उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details