मुंबई- शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, असे निर्देश राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने पोलीस ( Aaditya Thackeray ) आयुक्तांना दिले आहेत. ३ दिवसात कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आले ( National Commission for Child Rights ) आहेत. सेव्ह आरे या आंदोलनात अदित्य ठाकरे यांच्याकडून नियमांची पायमल्ली झाल्याची तक्रार करण्यात आली होती. आंदोलनात प्रथमदर्शनी बाल न्याय कायद्याच्या कलम ७५ चे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
केंद्र सरकार आणि शिवसेना यांच्या संघर्षात वाढ : राज्याचे माजी पर्यटन मंत्री तथा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर तीन दिवसात कारवाई करण्यात यावी याकरिता बालहक्क आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पुन्हा एकदा आता केंद्र सरकार आणि शिवसेना यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. रविवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आरे कारशेड विरोधात केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
हेही वाचा -Aarey Forest Protest : आरे मेट्रो-3 कारशेड विरोधात वणवा पेटला, शेकडो तरुण पर्यावरण प्रेमी रस्त्यावर
राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे आदेश - राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्रात असे म्हटले आहे की आर्य कारशेड विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात लहान मुलांचा वापर करण्यात आल्याचा ठपका ठेपका ठेवला आहे. आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आदेश राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने दिले आहे.