मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघालेली दरभंगा पवन एक्सप्रेसचे 11 डब्बे रेल्वे रुळावरुन घसरल्याची मोठी घटना ( Nashik Pawan Express Derailed ) घडली आहे. या घटनेमुळे सात रेल्वे गाड्या रद्द तर काही दोन रेल्वे ( Train Cancelled Pawan Express Derailed ) गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड करण्यात आल्या आहेत. परिणामी ५० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या विलंबाने धावत ( Train Late Nashik Pawan Express Derailed ) आहेत. या दुर्घटनेमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
सात रेल्वे गाडया रद्द - आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी इगतपुरी स्थानकाच्या देवळाली ते लहवी दरम्यान पवन एक्सप्रेसचे 11 डब्बे रेल्वे रुळावरुन घसरल्यामुळे डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाड्या खोळंबल्या आहे. परिणामी मध्य रेल्वेने सात रेल्वे गाड्या रद्द केल्या आहे. ज्यामध्ये ट्रेन क्रमांक १७०५७ सीएसएमटी मुंबई - सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 17612 सीएसएमटी मुंबई - हजूर साहिब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 17611 हजूर साहिब नांदेड - सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस - पुरी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 12146 पुरी - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 12111 सीएसएमटी मुंबई - अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस आणि ट्रेन क्रमांक 12112 अमरावती - CSMT मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस यांचा समावेश आहे.