महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'आ देखे जरा, किस में कितना है दम'; नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईक यांना खुले आव्हान - Narendra Mehta open challenge

आमदार प्रताप सरनाईक ( MLA Pratap Sarnaik ) यांनी मीरा भाईंदर येथील मनपाच्या ( Meera Bhayander Municipality ) कार्यक्रमात, माजी आमदार नरेंद्र मेहतांवर सडकून टीका ( Criticism of former MLA Narendra Mehta ) केल्यानंतर आता मेहतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

MLA Pratap Sarnaik
प्रताप सरनाईक

By

Published : Oct 15, 2022, 10:59 PM IST

मुंबई - राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमधील ( Shinde Fadnavis Govt ) अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. ओवळा माजीवाड्याचे आमदार प्रताप सरनाईक ( MLA Pratap Sarnaik ) यांनी मीरा भाईंदर येथील मनपाच्या ( Meera Bhayander Municipality ) कार्यक्रमात, माजी आमदार नरेंद्र मेहतांवर सडकून टीका ( Criticism of former MLA Narendra Mehta ) केल्यानंतर आता मेहतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सरनाईक हे नावाला आमदार असून मतदारसंघात विकासाच्या नावाने बोंब आहे. हिंमत असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन समोर यावे. दोघेही अपक्ष लढू, देखते है किस में कितना दम है, असे खुले आव्हान दिले आहे. आता सरनाईक हे आव्हान स्वीकारणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.



मेहता सरनाईक आमनेसामने -माजी आमदार नरेंद्र मेहता प्रताप सरनाईक यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. आता दोघांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. मीरा भाईंदर येथील कार्यक्रमात मेहता आणि सरनाईक आमनेसामने आले होते. दरम्यान, शहराच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध उपक्रमांचे नुकतेच उद्घाटन झाले. माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी यात खोडा घालण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर महाराणा यांच्या पुतळ्याचे अधिकृतपणे व सन्मानाने लोकार्पण व्हावे, अशी लोकांची इच्छा असताना, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे दोन वर्षा पूर्वी परवानगी नसताना बेकायदा अनावरण केले. त्यात स्वतःच्या नावाची पाटी लावून राजकीय स्वार्थ साधण्याचा खटाटोप केला गेला, असा गंभीर आरोप आरोप आमदार सरनाईक यांनी भर कार्यक्रमात केला. सरनाईकांच्या आरोपांचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी खंडन करताना, थेट मैदानात उतरण्याचा इशारा दिला.



नरेंद्र मेहता यांचा आरोप - माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा मागील निवडणुकीत पराभव केला. आता कायमस्वरूपी घरी बसवू या, तुम्ही तुमच्या पाठीशी आहे असे विधान प्रताप सरनाईक यांनी महापालिकेच्या कार्यक्रमात केले. एका शासकीय कामांत राजकीय भाषण करणे, कितपत योग्य आहे. हिंमत असेल तर समोरासमोर या. राजीनामा द्या, आपण दोघेही अपक्ष लढू, बघू कोण निवडून येतो. भाजपच्या युतीमुळे सरनाईक आमदार आहेत. अन्यथा निवडून येऊ शकत नाहीत, अशी स्थिती असल्याचा आरोप नरेंद्र मेहता यांनी केला. तसेच सरनाईक यांचे मीरा भाईंदरमध्ये बोगस कामकाज सुरू आहे. आयुक्तांना हाताशी धरून जमिनी हडपणे, बेकायदेशीर बांधकाम करण्याचा प्रकार सुरू केल्याचा गौप्यस्फोटही मेहता यांनी केला. या प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.


मतदार संघावरून वाद -२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती असल्यामुळे प्रताप सरनाईक तिसऱ्यांदा आमदार झाले. आता राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट युतीत निवडणूक लढवणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यापैकी ओवळा माजीवाड़ा मतदार संघ सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांना सोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील सरनाईकांवर दबाव टाकल्याचे समोर आले होते. सरनाईक यांनी या वादावर यानंतर पडदा टाकला. मात्र, सरनाईक आणि मेहतांमध्ये आता एकमेकांना खुले आव्हान देण्यात येत आहेत. येत्या काळात हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details