मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी मालवणी पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. (Narayan Rane's application in court) या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवार (१५ मार्च)रोजी सुनावणी होणार आहे. मालवणी पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी हा अर्ज करण्यात आला आहे.
गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अर्ज
या तक्रारीनंतर राणे पितापुत्र जबाब नोंदवण्यासाठी मालवणी पोलिसांसमोर हजरही झाले. (Malvani police file a case) त्यानंतर आता दिशा सालियन यांची आई वासंती सालियन यांच्या तक्रारीवरुन नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत राणेंनी उच्च न्यायालयात याचिका केली.
बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
दिशाच्या मृत्यूची खोटी माहिती पसरवल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा यावेळी राणेंनी केला. तसेच, सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन मंजूर करताना पुन्हा गुन्हा केल्यास जामीन रद्द करण्याचा इशाराही दिला होता. हा जामीन रद्द करण्यासाठीच आपल्यावर दिशाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
पुरावे पोलिसांना सुपूर्द करण्यास त्यांनी नकार दिला
तर पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञा पत्रात राणेंच्या कोठडीची मागणी केली आहे. दिशाच्या मृत्यूबाबत राणेंनी ज्या पुराव्यांच्या आधारे दावे केले त्यांनी पुरावे पोलिसांना सुपूर्द करण्यास त्यांनी नकार दिला आहे. दिशाच्या मृत्यूचा तपास सुरू असतानाही राणेंनी त्यांच्याकडे असलेला पुरावा तपास यंत्रणेकडे सुपूर्द केलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे नक्की कोणता पुरावा आहे, पुरावा नक्की आहे की नाही, हे शोधण्यासाठी त्यांची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
हेही वाचा -Nana Patole : ...तर भाजपला दोन खासदारांचा पक्ष होण्यास वेळ लागणार नाही -नाना पटोले