मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्यांनी त्यांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे, असे विधान खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर आगपाखड केली आहे. संजय राऊत आता बोलतायत, पण 'शिवसेनेत असताना मी संजय राऊतचा बाप होतो' असे विधान करत राणे यांनी राऊतांवर चांगलेच तोंडसुख घेतले.
खासदार नारायण राणे यांची खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका... हेही वाचा... 'चंद्रकांत पाटलांना सत्ता गेल्याच्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो'
शिवसेनेत सध्या काय चालले आहे, याची मला चांगली माहिती आहे. आपण शिवसेनेत असताना संजय राऊत यांना काहीही महत्व नव्हते. मी बाळासाहेबांच्या जवळ आलो की, संजय राऊत आमच्यापासून बराच लांब उभा राहत होते. शिवसेनेत असताना त्यावेळी मी संजय राऊतांचा बाप होतो, असे वक्तव्य राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत केले.
हेही वाचा... इंदिरा गांधी यांच्या संदर्भात एकही अपशब्द खपवून घेणार नाही; अशोक चव्हाणांचा संजय राऊतांना इशारा
संजय राऊत यांनी पुण्यात एका मुलाखती दरम्यान बोलताना, कुख्यात गुंड दाऊद याच्यासोबत आपले बोलणे झाल्याचा आणि त्याला आपण दम देखील दिल्याचे म्हटले. यावर बोलताना राणे यांनी, राऊत यांच्यावर टीका केली. 'संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. राऊत यांचे जर दाऊदशी बोलले झाले असेल, त्याला दम दिला असेल तर त्याचे राऊत यांच्यासोबत काय बोलणे झाले ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. तसेच राऊत यांच्या विधानाची चौकशी राज्याच्या गृहमंत्र्यांनी केली पाहिजे, अशी मागणीही नारायण राणे यांनी केली.