मुंबई - महाराष्ट्रात ठाकरे आणि राणे वाद हा नवीन नाही आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर केल्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर शिंदे-भाजप सरकार स्थापन झालं. सत्ता स्थापन होताच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागलं. त्याला शिवसेनेकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलं. त्यात आता शिंदे गटाते प्रवक्ते दीपक केसरकर यांनी थेट राणे यांच्यावर आरोप करत आदित्य ठाकरेंचा बचाव केला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची राणेंनी बदनामी ( narayan rane defame aaditya thackeray ) केली, असा आरोप केसरकरांनी नारायण राणेंवर केला ( deepak kesarkar allegation narayan rane ) आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
'हे आरोप संपूर्ण खोटे' -आज जे काही बोलणार आहे, त्यावर कोणताही प्रश्न विचारू नका, अशी सुरुवात करत दीपक केसरकर यांनी सुशांत सिंह प्रकरणाला हात घातला. यावेळी झालेल्या आरोपांमध्ये आणि वस्तुस्थितीत जमीन आस्मानाचा फरक होता. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची राणेंनी बदनामी केली. भाजपच्या मुख्यालयातून त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. राणे यांच्या या आरोपांनंतर उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारे शिवसेनेतील माझ्यासारखे अनेक नेते दुखावले गेले. भाजपच्या नेत्यांना याबाबत विचारणा केली. नारायण राणे यांच्याकडून अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यूनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. मात्र, हे आरोप पूर्णपण खोटे होते, असे सांगत दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली.