मुंबई - शिवाजी पार्कवरून शिमग्या सारखा दसरा मेळावा ( Dussehra Melawa ) साजरा झाला अशी घणाघाती टीका केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी केली ( Narayan Rane criticizes Uddhav Thackeray ) आहे. वैचारिक पातळीचे भाषणात नव्हते, असेही ते म्हणाले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी शिव्या शाप देण्यासाठी मेळावा घेतला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवाजी पार्क विचाराच्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र शिव्या देण्याचे काम केले गेले असाही आरोप राणे यांनी केला.
उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींवर टीका -दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, ( Uddhav Thackeray criticizes Narendra Modi ) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका ( Uddhav Thackeray criticizes Modi ) केली होती. या भाषणातील टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर देताना आज पत्रकार परिषद घेऊन जोडदार आगपाखड केली. उद्धव ठाकरे यांचा मेळावा म्हणजे शिमगा होता, अशी जळजळीत टीका यावेळी केली. दरम्यान, अभिनेत्री दिशा सालीयन, अभिनेता सुशांत सिंह यांच्या हत्या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना टार्गेट केले. तसेच आगामी काळात भाजप नेते, पक्षांवर टीका केल्यास मेळावा होऊ देणार नाही, असा सूचक इशारा दिला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आज बाळासाहेबांचे विचार राहिले नाहीत -शिवाजी पार्क झालेली सभा म्हणजे केवळ शिमगा, तमासगिरांचा मेळावा होता. वैचारिक पातळी भाषणात नव्हती. उद्धव ठाकरे भाषण करायला उभे राहिले, लोक मैदानातून बाहेर पडली. बाळासाहेब बोलायचे त्यावेळी सगळे लोक ऐकायची. आज बाळासाहेबांचे विचार राहिले नाहीत. सतत मराठी माणूस करत असतात. परंतु, मराठी माणसासाठी काय केले, असा सवाल राणे यांनी उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी पक्षाला रसातळाला नेला आहे, असा आरोप केला. राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात. मात्र दीड वर्षाच्या मुलाबद्दल उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य करताना लाज बाळगायला हवी होती. इतक्या लहान मुलाला राजकारणात ओढणाऱ्यांची पात्रता लक्षात येते, अशा शब्दांत ठाकरेंवर आसूड ओढले.
हिंदुत्वाच्या नावाखाली लबाडी -मोठमोठ्या लोकांची नावं घेऊन उद्धव ठाकरे यांनी टीका करत होते. मात्र, अडीच वर्षात अडीच तास फक्त मंत्रालयात आले. देशातील लोकांना संरक्षण कोणी दिली, कोण सांभाळतेय थोडी तरी मर्यादा भाषणात राखायला हवी होती. वीस मिनिटे चालू शकत नाही, नुसत्या तोंडाच्या फक्त बढाया आहेत. तसेच दसरा मेळाव्यात केलेल्या टिका म्हणजे 2019 मध्ये केलेल्या उपकाराची परतफेड आहे. हिंदुत्वाबाबत उद्धव ठाकरे यांनी तोंड उघडू नये, त्यांना नैतिक अधिकार नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली लबाडी केली असून उद्धव ठाकरे हे लबाड लांडगा आहेत, असा घणाघात राणेंनी चढवला. ज्येष्ठ नेते मनोहर जोशीच्या घरावरती सदा सरवणकर यांना हल्ला करायला भाग पाडल्याचा गंभीर आरोप केला. मलाही मारण्यासाठी शकील, छोटा राजन, सुभाष सिंग यांना सुपार्या दिल्या होत्या. परंतु, तेही काम करू शकले नाहीत, असा गौप्यस्फोट राणेंनी केला. १९९२ च्या दंगलीत उद्धव ठाकरे कुठे होते, असा सवाल विचारला.
आदित्य ठाकरेंना जेलमध्ये टाकणार -एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यामागे त्यांची मेहनत आहे. शिवसेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. यामध्ये नारायण राणे, एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान आहे. आमच्या आई-वडिलांनी जेवढी काळजी घेतली नाही तेवढी बाळासाहेबांनी आमची काळजी घेतल्याचेही नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंचे उत्पन्न काय याची जनतेला माहिती व्हावी. अंकिता भंडारे मुलीचा मृत्यू झाला. मात्र, राज्यात अभिनेत्री दिशा सालीयन, अभिनेता सुशांत सिंग यांचे खून झाले. दिशा सालीयन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात आहे. हे प्रकरण सचिन वाजे यांनी मिटवल्याचा गंभीर आरोप, राणेंनी केला. आता सरकार आमचे असून दिशा, सुशांतची चौकशी करून आदित्य ठाकरे यांना जेलमध्ये टाकले जाईल, अशी उघडपणे धमकी दिली.
उद्धव ठाकरे शिंदेंचा खून करण्याचा प्रयत्न केला - नक्षलवादी कारवाया संपवण्याएवजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री काळात नक्षलवादी कारवायांना प्रोत्साहन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्यासाठी प्रयत्न केला. शरजिल उसनामीला अटक करेन सांगितले, सत्ता गेली मात्र अजून काही केलेले नाही. उलट दाऊदसोबत संबंध असेलेले नवाब मलिकांना मंत्रिमंडळात सामावून घेतला. अडीच वर्षात माझ्या घरावर कारवाईसाठी प्रयत्न केले. माझ्या घरापर्यंत येणाऱ्याला मी स्वस्त झोपू देणार नाही, असे खुले आव्हान नारायण राणे यांनी दिले. बाळासाहेबांचा एकही गुण नाही. सत्तेसाठी एकनाथ शिंदे यांना डावळून मुख्यमंत्री झाला, असा आरोप राणे यांनी करताना, मोदी सरकारने कोविड काळात तीस योजना जाहीर केल्या. उद्धव ठाकरेंची लायकी तरी आहे का तेवढी. यापुढे आमच्या नेत्याबद्दल पक्षाबद्दल अशी वक्तव्य केल्यास सभा होऊ देणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला.