मुंबई - काँग्रेस पक्षातील दोन मंत्र्यांचे घोटाळे लवकरच आपण बाहेर काढणार आहोत असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्याला "कर नाही, त्याला डर कशाला" असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळेस चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोलाही पटोले यांनी लगावला आहे.
'कर नाही, तर डर कशाला' नाना पटोले यांचा चंद्रकांत पाटलांना टोला - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
आघाडी सरकारसमोर जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मात्र, हे महत्त्वाच्या प्रश्नांपासून लक्ष दूर करण्यासाठीच भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने आरोप केले जात असल्याचे पटोले यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर आरोप केले जात आहेत. मात्र, आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांचा कुठलाही दोष नाही. त्यामुळे आम्ही आरोपांना घाबरत नाही. आघाडी सरकारसमोर जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मात्र, हे महत्त्वाच्या प्रश्नांपासून लक्ष दूर करण्यासाठीच भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने आरोप केले जात असल्याचे पटोले यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्र सरकार हे ब्लॅकमेलिंग करणारे
सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआय अशा तपास यंत्रणा आपल्या हाताशी धरून आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. केंद्र सरकार हे ब्लॅकमेलिंग सरकार असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.
किरीट सोमय्या यांना अटक नाही
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या कोल्हापूरला गेले असते. तर, त्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. म्हणूनच कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना जिल्हा बंदीची नोटीस पाठवली होती. त्यामुळेच कोल्हापूरच्या वेशीवर किरीट सोमय्या यांना थांबवण्यात आले. राज्यात कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची जबाबदारी राज्य सरकारची असते. त्यानुसारच राज्यसरकारने आपले काम केले. यामध्ये किरीट सोमय्या यांना अटक केली नव्हती. त्यामुळे आपल्याला अटक केली असं किरीट सोमय्या यांचे वक्तव्य म्हणजे साफ खोटं असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीस दबंग नेता, 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात - चंद्रकांत पाटील