मुंबई -आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील विविध घडामोडींच्या आधारावर राज्यपालांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेनार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगीतले. या भेटीत राज्य सरकार आपली बाजू राज्यपालांकडे मांडणार आहे.
आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यपालांना भेटनार, कोणतीही भेट मागितली नसल्याचे राज भवनचे स्पष्टीकरण राज्यपाल शहराबाहेर जाणार -
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यसरकार आपली बाजू मांडण्यासाठी राज्यपालांची भेट घेनार आहे. मात्र,अद्याप कोणत्याही प्रकारची राज्यपालांची वेळ घेण्यात आली नसून राज्यपाल राज भवन बाहेर जाणार असल्याचे राज भवनने जाहीर केले आहे.
भाजप शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट -
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झाले आहेत. यात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. राज्यपालांची भेट घेऊन राज्यात होणाऱ्या परिस्थितीचा आढावा आपण घेऊन त्यांची माहिती राष्ट्रपतीकडे पाठवावी, अशी मागणी या नेत्यांनी यावेळी केली. या बद्दल माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना यापुर्वीच दिली होती.
काय आहे प्रकरण -
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना मेल केले होते. त्यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरी सुविधा कक्षाचे अधिकारी संजय पाटील आणि मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या दोघांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. तसेच महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करावी, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोपही परमबीर सिंग यांनी केला.