महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मोहन भागवतांनी काँग्रेसप्रमाणेच मोदी सरकारलाही सल्ला द्यावा - नाना पटोले - पावसाळी अधिवेशन

महाराष्ट्राचं राजकारण असंच असतं. इथं कोणाशीही वैयक्तिक शत्रुत्व निर्माण होत नाही. निवडणुकीदरम्यान प्रतिस्पर्धी असतात. त्यामुळं फडणवीसांच्या वक्तव्यामध्ये काहीच नवीन नाही. विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय तीनही पक्ष मिळून निर्णय घेतील. कारण कोरोनामुळे किती आमदार उपस्थित राहू शकतील याबाबत निश्चितता नाही. कृषी कायदा लागू करायचा की नाही याचा अधिकार राज्याला आहे, असे नाना पटोले म्हणाले.

nana patole
nana patole

By

Published : Jul 5, 2021, 1:16 PM IST

मुंबई- मोहन भागवतांचं वक्तव्य हे 'देर आये दुरुस्त आये' असं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचा डीएनए एकच आहे, अशी काँग्रेसची भूमिका होती. सर्व धर्म समभावाचा हा देश आहे. त्यामुळं मोहन भागवतांच्या वक्तव्याचा विरोध करण्याचं कारण नाही. मात्र आज देशाचा जीडीपी -७.३ आहे आणि तो रोज घसरत आहे. बेरोजगारी, महागाई वाढत आहे. त्यामुळं मोहन भागवत जी ज्याप्रमाणे तेव्हाच्या सरकारला सल्ला द्यायचे, तसाच सल्ला त्यांनी आता दिला तर बरं वाटेल.

साखर कारखाने कारवाईवर प्रतिक्रिया..

साखर कारखान्यांवरील कारवाईच्या यादीत दोन कारखाने गडकरींशी संबंधित आहेत. त्यामुळं भाजपा काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आपल्याच नेत्यांना अडचणीत आणत आहे का? असं विचारलं असता नाना पटोले म्हणाले, की भाजपामध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. त्यातूनच हे दिसत आहे. परवाही आशिष शेलार आणि संजय राऊत यांची भेट झाली. नागपूरकरांच्या त्रासामुळे शेलार यांनी राऊतांची भेट घेतली असावी असाही एक भाग असू शकतो. साखर कारखान्याबाबतच्या भूमिका संशयित आहेत. वस्तुस्थिती समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देता येईल.

नाना पटोलेंनी माध्यमांशी साधला संवाद..

फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया..

महाराष्ट्राचं राजकारण असंच असतं. इथं कोणाशीही वैयक्तिक शत्रुत्व निर्माण होत नाही. निवडणुकीदरम्यान प्रतिस्पर्धी असतात. त्यामुळं फडणवीसांच्या वक्तव्यामध्ये काहीच नवीन नाही. विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय तीनही पक्ष मिळून निर्णय घेतील. कारण कोरोनामुळे किती आमदार उपस्थित राहू शकतील याबाबत निश्चितता नाही. कृषी कायदा लागू करायचा की नाही याचा अधिकार राज्याला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितानुसार कायद्यात बदल करावेत. वेळ पडल्यास त्याला पब्लिक डोमेनमध्ये ठेवावं. शेतकऱ्यांचंही याबाबत मत घेऊन, त्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. निवडणुकीबाबत आत्ता विचार करण्याची गरज नाही, त्याला तीन वर्षं आहेत. सध्या आम्ही महागाई आणि इतर प्रश्नांबाबत विचार करत आहोत.

ABOUT THE AUTHOR

...view details