महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nana Patole on Lata Mangeshkar Memorial : लता दिदींचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावे - नाना पटोले - लता मंगेशकर शिवाजी पार्क स्मारक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on Lata memorial ) म्हणाले, की लता दीदी यांचे स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे. देशातून आणि जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला गेल्यानंतर लतादीदींचा गोड आवाज ऐकायला ( Lata Mangeshkar memorial in Shivaji Park ) मिळावा. आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्मरणात राहील, अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावे ही काँग्रेसची ( Congress on Lata Mangeshkar memorial ) भूमिका आहे.

नाना पटोले
नाना पटोले

By

Published : Feb 7, 2022, 3:25 PM IST

मुंबई -लता दीदींचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावे, अशी मागणी भाजपनेकेल्यानंतर आता काँग्रेसनेही या मागणीचे ( Nana Patole on Lata Mangeshkar memorial ) समर्थन केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली. लता दिदींना मुंबईत आज काँग्रेसच्यावतीने श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on Lata memorial ) म्हणाले, की लता दीदी यांचे स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे. देशातून आणि जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला गेल्यानंतर लतादीदींचा गोड आवाज ऐकायला ( Lata Mangeshkar memorial in Shivaji Park ) मिळावा. आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्मरणात राहील, अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावे ही काँग्रेसची ( Congress on Lata Mangeshkar memorial ) भूमिका आहे. लतादीदी या काँग्रेस परिवारातल्याच होत्या. त्यांचे योगदान एवढे मोठे आहे. आता थोड्या वेळात मी लतादिदींच्या परिवाराचे सांत्वन करायला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

लतादीदी यांनी पेडर रोडच्या उड्डाणपुलाचा जेव्हा विषय आला होता तेव्हा त्यांनी मला डिस्टर्ब होईल म्हणून सांगितले होते. त्यावेळी आघाडीचे सरकार होते. तेव्हा आम्ही निर्णय घेतला आणि उड्डाणपूल पेडर रोडला झाला नाही, असेही पटोले म्हणाले.

हेही वाचा-Ram Kadam Letter Cm Thackeray : शिवाजी पार्कमध्ये लतादीदींचे स्मारक उभारा, राम कदमांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
म्हणून काँग्रेस नेते लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीला अनुपस्थित
लता दिदींच्या अंत्यविधीला काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता. यावरून टीकेची झोड उठली आहे. नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे ते काल लता दिदींच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत. माझ्या बहिणीच्या सास सुद्धा वारल्यामुळे मी तिकडे होतो. आमचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप तिथे होते. मात्र महाराष्ट्रात सध्या तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या लोकांना आम्ही सूचना दिल्या आहेत. कालच सर्व ठिकाणी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा काम केेल आहे. असलम शेखसुद्धा मुंबईबाहेर होते. वर्षा गायकवाड मुंबईबाहेर होत्या. शनिवार व रविवारमुळे अनेकांचे दौरे होते. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाही.
हेही वाचा-OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणाचा अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द!

शाहरुख खान
प्रत्येकाला संविधानाप्रमाणे स्वतंत्र आहे की आपल्या धर्मानुसार वागावे. काहीजण मुद्दामून धर्मावर टीका करून मोठे करण्याचे काम करत आहे. काही जणांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे की दुसऱ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालायचा, असा टोला ( Nana Patole on Shahrukh Khans controversy ) लगावला.

मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस
जेव्हा निवडणूक समोर येईल तेंव्हा जी परिस्थिती तयार होईल त्यानुसार निर्णय घेऊ. आता निवडणूक झाली त्यामध्ये प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढला आहे. येत्या काळात चित्र स्पष्ट होईल, असे पटोले म्हणाले.

वाईन विक्रीचा निर्णय
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विधान आले होते. तेव्हा कॅबिनेटला अधिकार असल्याचे आम्ही सांगितले होते. लोकांना जर या निर्णयाविरोधात राग आहे. तर जनतेच्या हिताचा निर्णय घेतला गेला पाहिजे. त्यामुळे शरद पवार यांच्या विधानाचे आम्हीसुद्धा समर्थन केल्याचे पटोले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details