मुंबई -वाढती महागाई, बेरोजगारी आणि मोदी सरकारची दडपशाही या विरोधात आज काँग्रेसकडून देशभर आंदोलन ( Congress agitation against inflation ) छेडण्यात आले. मात्र मुंबईला काँग्रेस नेत्यांच्या आंदोलनापासून दूर ( Congress agitation failed in Mumbai ) ठेवण्यात आले. पोलिसांनी दडपशाहीचा, बलाचा वापर करत त्यांना आंदोलन करून दिले नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मुंबईतील आझाद मैदान येथे नेऊन सोडले.
आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न?-याप्रसंगी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पूर्ण देशात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर आलेले आहेत. केंद्र शासनाकडून विरोधकांचा, जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही मोहीम आता सुरू झालेली आहे. 'नाचता येईना, अंगण वाकडे' अशी भाजपची अवस्था झाली आहे. राहुल गांधींनी कालही सांगितले तुम्हाला जे करायचे ते करा; परंतु देशाच्या हिताची लढाई काँग्रेस लढेल असेही नाना पटोले म्हणाले. तसेच विरोधकांना राष्ट्रपतींना भेटू दिले जात नाही. देशात दबावतंत्र चालू आहे. याचा काँग्रेस निषेध करते. ही लोकशाही आहे, मोदींची दडपशाही नाही. अतिरेक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही उत्तर देऊ. आंदोलन स्थगित नाही, आंदोलन सुरू राहणार असा इशारा नाना पटोले ( Attempts to suppress Congress agitation ) यांनी दिला.