मुंबई - युक्रेन आणि रशिया ( Russia-Ukraine War ) यांच्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाचे रुपांतर आता युद्धात झाले आहे. युक्रेनमध्ये हजारो भारतीय अडकले आहे. यात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. काँग्रेस नेते नाना पटोलो यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या एका विद्यार्थींनीशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला ( Nana Patole interacts with Mumbai's Chaitali ) आणि तिथली परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून माहिती दिली आहे. तसेच निवडणूक प्रचार थांबवा आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सुखरूप परत आणा, मोदीजी, असेही म्हटलं.
मुंबईमधील चैताली नावाची विद्यार्थींनी युक्रेनमध्ये अडकली आहे. तिने नाना पटोले यांना तेथिला परिस्थितीची माहिती दिली. 'युक्रेनमध्ये अडकलेली मुंबईतील चैताली या विद्यार्थिनीशी बोललो. युद्धामुळे तेथील परिस्थिती अत्यंत कठीण असून विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. मोदीजी, निवडणूक प्रचार थांबवा आणि आमच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सुखरूप परत आणा', असे टि्वट नाना पटोले यांनी म्हटलं.
युक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या सर्वांच्या सुरक्षेची आम्हाला काळजी आहे. केंद्र सरकारने त्यांना वेळीच तेथून हटवायला हवे होते. हे परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे अपयश आहे. त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करून त्यांना तातडीने परत आणावे, असेही त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं.