मुंबई -3 ते 25 मार्च दरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विधानसभा अध्यक्षांची निवड पार पडेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच लवकरच विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून नाव जाहीर केले जाईल, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत. काँग्रेसच्या डिजिटल मेंबर बाबतच्या घेतलेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच आपल्याला केव्हाही मंत्रीपदाची अपेक्षा नव्हती. मंत्रीपद आपल्याला मिळावे, असा कधीही आपला आग्रह नव्हता. काँग्रेसचे मंत्री बदलण्याबाबत राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.
- '10 मार्चनंतर जनतेसाठी होणार बदल'
दहा मार्चनंतर जनतेसाठी काँग्रेस बदल करणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काँग्रेस मंत्र्यांना आणि नेत्यांना थेट जनतेशी संवाद साधता येत नव्हता. मात्र लवकरच राज्यभरात काँग्रेसचे मंत्री आणि नेते जनता दरबार घेतील. या पद्धतीचा बदल काँग्रेसमध्ये होणार असल्याचे भाकित आपण केले होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सत्ताबदल होणार आहे, असे सांगत आहेत. तो बदल भाजपा आपल्या स्वार्थासाठी करू पाहतये, असा टोलाही नाना पटोले यांनी भाजपाला लगावला.
- 'भाजपाने जनतेला वेठीस धरले'