मुंबई - देशात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात मुकेश अंबानी यांची छबी खराब झाली आहे. तसेच अंबानी यांचे शेअर बाजारात लाखो कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अंबानी यांना सहानुभूती मिळावी, यासाठी तर भाजपचा खटाटोप नाही ना? अशी शंका नाना पटोले यांनी माध्यमांच्या समोर उपस्थित केली.
पटोले म्हणाले, की अंबानी यांना या आधी सुद्धा धमकी देण्यात आली होती. 2009 साली बोरडे नावाच्या व्यक्तीचे नाव पुढे आले होते. पण त्या संशयित आरोपीचा ही मृतदेह मिळाला होता. 2013 साली ही अंबानी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ही गोटे आढळले होते. मुंबईत अनेक मोठे उद्योगपती राहत असताना केवळ अंबानी यांनाच धमकी का मिळते. अंबानी यांना घराच्या वर हेलिपॅड तयार करण्याची परवानगीही अद्याप मिळाली नाही, ही परवानगी मिळवण्यासाठी भाजपकडून वातावरण निर्मिती केली जात आहे का? असा ही आम्हाला संशय येतो यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी.