मुंबई -भाजपने केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या दावणीला बांधल्या आहेत. राजकीय नेत्यांवर कारवाईसाठी गैरवापर करण्यात येत असलेल्या ईडीची (BJP threaten Voters) धमकी आता भाजपने कोल्हापुरातील (BJP Kolhapur) मतदारांनाच दिली आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. धमकी देणे हे अत्यंत दुर्दैवी आणि लोकशाहीला मारक असल्याचेही नाना पटोले यावेळी म्हणाले.
Nana Patole reply BJP Threat : अपयशाच्या भीतीने भाजप मतदारांना धमक्या देते - नाना पटोले - भाजप मतदारांना ईडीची धमकी
भाजपने केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या दावणीला बांधल्या आहेत. राजकीय नेत्यांवर कारवाईसाठी गैरवापर करण्यात येत असलेल्या ईडीची (BJP threaten Voters) धमकी आता भाजपने कोल्हापुरातील (BJP Kolhapur) मतदारांनाच दिली आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
मतदारांनाही ईडीची धमकी - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील मतदारांना तुमची ईडीकडून चौकशी होईल अशी धमकी दिली हे अत्यंत दुर्दैवी आणि लोकशाहीला मारक आहे. भाजपाचा जनाधार घसरला असून, अपयशाच्या भीतीने भाजप अशा धमक्या देत असल्याचेही ते म्हणाले. भाजपाला कोल्हापुरात पराभव दिसत असल्याने निराशेपोटी चंद्रकांत पाटील यांनी थेट मतदारांनाच धमकी दिली आहे. काही लोक पेटीएमच्या माध्यमातून पैसे वाटत असून, तुम्ही ते पैसे घेतले तर त्याची चौकशी ईडीकडून केली जाऊ शकते, अशी धमकी देण्यात आली आहे. आता ईडी हजार-पाचशे रुपयांची चौकशी करणार का? आणि ती चौकशी भाजपाच्या इशाऱ्यावर होणार का? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला.