मुंबई - राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी यंदाची विधानसभा निवडणूक एकत्रच लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला स्वबळावर लढण्यापेक्षा आघाडी कायम राखून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
'विधानसभा एकत्रच लढणार'; नाना पटोलेंच्या वक्तव्याने आघाडी कायम राहण्याचे संकेत
राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी यंदाची विधानसभा निवडणूक एकत्रताच लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला स्वबळावर लढण्यापेक्षा आघाडी कायम राखून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकार हे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा विचाराच्या लोकांना सत्ते बाहेर ठेवण्यास सक्षम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दोन्ही पक्षांमध्ये आज(दि.१६सप्टेंबर)ला बैठक पार पडली. यामध्ये जागावाटपाचा फॉर्मुला अजूनही ठरला नसल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु, ज्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे तुल्यबळ अधिक आहे, अशा ठिकणी आम्हाला जागावाटपात प्राधान्य द्यावे, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे पटोले यांनी सांगितले आहे.