महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर, राज्य सरकारने कारवाई करावी - नाना पटोले - संजय राऊत पत्रकार परिषद नाना पटोले प्रतिक्रिया

विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole comment on Sanjay Raut allegations ) यांनी केली आहे.

Nana Patole comment on Sanjay Raut allegations
संजय राऊत पत्रकार परिषद नाना पटोले प्रतिक्रिया

By

Published : Feb 15, 2022, 7:37 PM IST

मुंबई -शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut allegations ) यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजप नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole comment on Sanjay Raut allegations ) यांनी केली आहे.

माहिती देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

हेही वाचा -Maharashtra Budget Session 2022 : तीन मार्चपासून मुंबईत होणार राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांच्या पाठीशी आम्ही आहोत, ईडीने मुंबईतील काही बिल्डरांकडून ३०० कोटी रुपये घेतल्याचा आणखी एक गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ईडीने हे पैसे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पाठविले का? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा एवढे धाडस करू शकत नाहीत, असेही पटोले म्हणाले. तसेच, हे सर्व पेपर राऊत केंद्र सरकारला देणार आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. त्याची चौकशीही केंद्र सरकारने करावी, अशी मागणीही पटोले ( Nana Patole ) यांनी केली.

केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी दबाव आणण्याचे प्रयत्न

केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणण्याचे षडयंत्र सुरू आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे ब्लॅकमेल करून आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे, हे आम्ही वारंवार सांगितलेले आहे. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबी, एनआयएच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कारवायांमधून हे दिसून आले आहे. सरकार पाडण्यासाठी उताविळ झालेले भाजपाचे नेते केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, महाविकास आघाडी सरकार भक्कम असून, हे सरकार पडणार नाही, आम्ही सर्व एकत्र आहोत. संजय राऊत यांनी आज पुराव्यासह भाजपातील नेते व भाजपाशी संबंधित लोकांचे काळे धंदे उघड केले आहेत. घोटाळ्यांचे आरोप करणारे सोमैयासारखे भाजपवालेच घोटाळेबाज आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे, असे पटोले म्हणाले.

फडणवीस सरकारच्या काळात २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोपही राऊत यांनी केले आहोत. भाजपच्या एका माजी मंत्र्यांने मुलीच्या लग्नात नऊ कोटींचे कारपेट अंथरल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. फडणवीस सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाल्याचे काँग्रेस पक्षाने वारंवार सांगितले होते. पण, फडणवीसांनी कसलीही कारवाई न करता सगळ्या घोटाळेबाजांना क्लिन चिट देऊन टाकल्या होत्या. आता मविआ सरकारने या घोटाळ्यांचीसुद्धा चौकशी करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केली.

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना नेते संजय राऊत ( MP Sanjay Raut Press) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नगरसेवक निल सोमैया (Neil Somaiya) यांच्यावर कडाडून टीका केली. पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाईंड राकेश वाधवानशी सोमैया यांचे संबंध आहेत. सोमैयांचा मुलगा तर या मास्टरमाईडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. आदित्य ठाकरेंना (aaditya thackeray) माझे आवाहन आहे की, याची ताबडतोब चौकशी करून निल सोमैया आणि किरीट सोमैया यांना अटक करा. तसेच, पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी पुढील आरोप केलेत

खासदार संजय राऊत म्हणाले की, पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राकेश वाधवान याला ब्लॅकमेल केले आणि त्याच्याकडून कोट्यवधीची जमीन घेतली. त्यांनी एक जमीन सात कोटी रुपयांना आणि वसई येथील 400 कोटी रुपयांची जमीन चार कोटी रुपयाला घेतली आहे. त्या जमिनीवर कंपनी आहे. त्या कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमैया आहे. निकॉन फेज वन आणि निकॉन फेज दोन हे हजारो कोटींचे प्रकल्प उभारले आहेत. त्याला पर्यावरण क्लिअरन्स नाही. या प्रकरणी कंपनीच्या सर्व परवानग्या रद्द करा, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

किरीट सोमैया दलाल असल्याचा आरोप

खासदार संजय राऊत भाजप नेते किरीट सोमैयांविषयी बोलताना म्हणाले की, छत्रपतींच्या या राज्यामध्ये या आधी असे घाणेरडे राजकारण केले गेले नाही. उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या रोज बातम्या उठवायच्या. पण, या बातम्या जो सांगतो तो दलाल आहे. किरीट सोमैया हा माणूस मराठी द्वेषी आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आधी त्याचे थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार? तसेच किरीट सोमैया हे भाजपचे फ्रंटमॅन आहेत.

मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी

पीएमसी घोटाळ्यातील आरोपीने सोमैयांच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली? हा भ्रष्टाचाराविरोधात लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतो आहे. आम्हाला अक्कल शिकवतो आहे. एकीकडे भ्रष्टाचाराविरोधाची भजने करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा. देवेंद्र लधानी हा सोमैयांचा फ्रंटमॅन आहे. त्यांच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा -ED and NIA Raid in Mumbai : केंद्रीय तपास यंत्रणांकडून दाऊदच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापेमारी

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details