महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Naming Ceremony At Rani Bagh : राणीबागेत पेंग्विन, वाघाच्या पिल्लांचे बारसे, 'ऑस्कर' आणि विरा' असे नामकरण - मुंबईच्या राणीबागेतील वाघ

मुंबईच्या राणीबागेत ( Rani Bagh Mumbai ) एक अनोखा सोहळा पार पडला. येथील एका पेंग्विनने पिल्लाला तर वाघाने बछड्याला जन्म दिला. या दोन्ही पिल्लांचा नामकरण सोहळा ( Naming Ceremony At Rani Bagh ) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

नामकरण
नामकरण

By

Published : Jan 18, 2022, 4:01 PM IST

मुंबई- भायखळा येथजील राणीबागेत ( Rani Bagh Mumbai ) म्हणजेच विरमाता जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पेंग्विनने पिलाला तर वाघाने बछड्याला जन्म दिला आहे. आज या दोन्ही पिलांचे नामकरण करण्यात ( Naming Ceremony At Rani Bagh ) आले. पेंग्विनच्या पिलाचे ऑस्कर आणि वाघाच्या बछडीचे नाव विरा असे करण्यात आल्याची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांनी केली.

राणीबागेत पेंग्विन, वाघाच्या पिल्लांचे बारसे, 'ऑस्कर' आणि विरा' असे नामकरण

पेंग्विन आणि वाघांच्या बाळांचे नामकरण

मुंबई महापालिकेची भायखळा येथे राणीबाग आहे. या राणीबागेत परदेशातून हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले ( Penguin In Rani Bagh ) आहेत. या पेंग्विनपैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. यामुळे राणीबाग आणि पालिका प्रशासनावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर १ मे २०२१ ला म्हणजेच महाराष्ट्र आणि कामगार दिनी पेंग्विनने एका पिलाला जन्म दिला. त्याचे नाव ओरियो असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर मोल्ड नावाचा नर आणि फ्लिपर नावाच्या मादी पेंग्विनने १८ ऑगस्ट २०२१ रोजी एका नर पिल्लाला जन्म दिला आहे. त्याचे नाव ऑस्कर ठेवण्यात आले आहे. यामुळे आता पेंग्विनची संख्या ९ झाली आहे. राणीबागेत १५ वर्षानंतर १२ फेब्रुवारी २०२१ ला बंगाल टायगरची जोडी आणण्यात ( Tiger In Rani Bagh Mumbai ) आली. त्यामधील नर वाघाचे नाव शक्ती तर मादी वाघाचे नाव करिश्मा असे आहे. या वाघांच्या जोडीने १४ नोव्हेंबर २०२१ रोजी म्हणजेच बालदिनी एका नर मादीला जन्म दिला आहे. या मादीचे नाव विरा असे ठेवण्यात आले आहे. राणीबागेत आता ३ वाघ झाले आहेत. वाघाचे पिल्लू लहान असल्याने कोरोचा प्रसार कमी झाल्यावर पुढील दोन महिन्यानंतर राणीबागेत पर्यटकांना प्रवेश दिला जाऊ शकतो. त्यानंतर वाघाच्या बछडा पर्यटकांना पाहता येणार आहे.

प्राण्यांना चांगला सहवास मिळाला

कोणत्याही प्राण्याला चांगला सहवास मिळाला कि त्यांना सुरक्षित वाटते. त्यानंतर त्यांचे मेटींग होऊन ते आपल्या बाळाला जन्म देतात. गेल्या वर्षभरात राणीबागेत पेंग्विनने दोन पिलांना तर वाघाने एका मादी बछड्याला जन्म दिला आहे. यामुळे राणीबाग आता एक ब्रीडिंग सेंटर झाले आहे असे महापौर म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नेहमीच राणीबाग आणि प्राण्यांची आस्थेने चौकशी करतात. आता पेंग्विन आणि वाघाच्या बाळांना दिलेली नावे आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून देण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली.

राणीबागेतील प्रथा-परंपरेनुसार पेंग्विन पिल्लांचे नामकरण

राणीबागेतील हत्तींची अनारकली व लक्ष्मी तर एका गेंड्याचे शिवा हे नामकरण करण्यात आले होते. त्याप्रमाणे आता पेग्विन पिल्लांचे आणि वाघाच्या बछड्याचे नामकरण करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details