महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Penguin Puppies Mumbai : राणीबागेत पेंग्विनच्या पिलांचे होणार बारसे, महापौरांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा - राणीबागेत पेंग्विनचा जन्म

उद्या राणीच्या बागेतील ( Ranibagh Mumbai ) पेंग्विनच्या पिलांचे ( Naming of Penguin Puppies ) महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांच्या नामकरण करण्यात येणार आहे. पेंग्विन प्रकरणावरुन विरोधकांनी चांगलीच टीका केल्याचे पाहायला मिळाले होते.

पेंग्विनचे संग्रहित फोटो
पेंग्विनचे संग्रहित फोटो

By

Published : Dec 21, 2021, 8:06 PM IST

मुंबई -बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेल्या राणीबागेत ( Ranibagh Mumbai ) पेंग्विनने ( Penguin ) दोन पिलांना जन्म दिला आहे. ही पिल्ले आता मोठी झाली असून या पिलांची नावे ठेवली ( Naming of Penguin Puppies ) जाणार आहेत. यासाठी राणीबाग प्रशासनाकडून ( Ranibagh Administration ) तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (बुधवारी) महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) या पिल्लांचे बारसे करणार असून त्यांचे नामकरणही करणार आहेत.

  • राणीबागेत पेंग्विनचा जन्म

राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रालयात २६ जुलै २०१६ रोजी ८ पेंग्विन आणण्यात आले. त्यानंतर लगेच एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता. राणीबागेतील दोन पेंग्विन माद्यांनी पिल्लांनाही जन्म दिला आहे. डेसी नावाच्या मादीने अंड दिले होते. त्यातून एक मे २०२१ मध्ये एका पिल्ल्याचा जन्म झाला. तर फ्लिपर नावाच्या मादीच्या अंड्यातून १९ ऑगस्ट २०२१ मध्ये अजून एका पिल्लाचा जन्म झाला. त्यामुळे राणीबागेतील पेंग्विनची संख्या आता नऊ झाली आहे.

  • राणीबागेतील प्रथा-परंपरेनुसार नामकरण

राणीबागेतील हत्तींची अनारकली व लक्ष्मी तर एका गेंड्याचे शिवा हे नामकरण करण्यात आले होते. त्याप्रमाणे आता पेग्विन पिल्लांचे नामकरण करण्यात येणार आहे. उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजता हा नामकरण सोहळा होणार आहे. या नामकरणासाठी पाहुणे म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. राणीबागेत अशा प्रकारचा प्रथमच महापौरांच्या उपस्थितीत असा नामकरण सोहळा होत आहे.

  • पेंग्विनवरून टिका

राणीबागेत पेंग्विन आल्यावर एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता. तसेच पेंग्विन कक्ष उभारण्याचे काम एका काळ्या यादीतील कंत्राटदाराला देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावरून सत्ताधारी आणि पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली गेली होती. पेंग्विनच्या वाढत्या देखभाल खर्चावरून शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व शिवसेनेला भाजपासह विरोधकांकडून लक्ष्य केले गेले आहे. आता पेंग्विनचे बारसे केले जाणार असल्याने या सोहळ्यावरून विरोधकांना पुन्हा टीकेची संधी चालून आली आहे.

हेही वाचा -पेंग्विनवर होणाऱ्या खर्चामुळे विरोधी पक्ष अन् सत्ताधारी आमने-सामने

ABOUT THE AUTHOR

...view details