मुंबई - गोवंडी मधील डंम्पीक ग्राऊंड येथे दोन एकराची जागा उद्यानासाठी समाजवादी पार्टी चे वार्ड क्रमांक136 च्या नगरसेविका रुकसाना सद्दीकी यांनी मंजूर केली होती. त्या उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव द्यावे अशी शिफारस सद्दीकी यांनी महानगरपालिका मध्ये केली होती. स्थानिक नगरसेविका यांनी माध्यमांशी बोलताना, येथे मोठ्या प्रमाणात डम्पिंग ग्राउंड होते. अर्ध्याहुन जास्त जागा याची खराब झाली होती. उद्यानासाठी ही आरक्षित जागा होती. अनेक अडथळे ना सामोरे जाऊन येथे हे उद्यान बनले जात आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम वर्ग राहतो. त्यामुळे आम्ही टिपू सुलतान नाव ठरवले. कारण टिपू सुलतान हे एक स्वातंत्र्य सैनिक होते. या स्वातंत्र्य सैनिक यांचा कोणता धर्म नसतो. ते समाजासाठी लढत असतात, असेही सिद्धिकी यांनी सांगितले.
उद्यानाला टिपू सुलतान नाव द्या; नामांतरणावरून नवीन वाद
गोवंडी मधील डंम्पीक ग्राऊंड येथे दोन एकराची जागा उद्यानासाठी समाजवादी पार्टी चे वार्ड क्रमांक136 च्या नगरसेविका रुकसाना सद्दीकी यांनी मंजूर केली होती. त्या उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव द्यावे अशी शिफारस सद्दीकी यांनी महानगरपालिका मध्ये केली होती.
भाजपाचे नगरसेवकांनी महापौर यांच्या कडे जाऊन या नावाचा विरोध केला. याचबरोबर काही हिंदू संघटना जाऊन यांनी ही या नावाचा विरोध केला आहे. हा आजाद हिंदुस्थान आहे. येथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि नगरसेविका असून मला ही अधिकार आहे. त्यामुळे मी हा विषय महानगरपालिकामध्ये मांडला. महानगरपालिका यावर निर्णय घेईल, असे सिद्धीकी यांनी सांगितले. भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी शिवसेनेच्या हिंदुत्ववर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की ह्या आधी जेव्हा मी घाटकोपर -मानखुर्द लिंक रोड उड्डाणपूलाचे नाव शिवाजी महाराज उड्डाणपूल ठेवले पाहिजे, असा प्रस्ताव दिला असता तेव्हा शिवसेनेचे खासदार यांनी हा उड्डाणपुलास सुफी संत सुल्ताना हिंद खवाज्या गरीब नवाज असे नाव देण्यास सांगितले.आणि आता ही गोवंडी मधील उद्यानास 'टिपू सुलतान 'असे नाव देण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे. त्यातून असे दिसून येते की हिंदुत्वपासून शिवसेना दूर गेली, असेही मनोज कोटक यांनी सांगितले.