मुंबई -नवी मुंबई येथील विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव राहणार आहे. त्या विमानतळाची जागा जरी पनवेल, नवी मुंबईत असली तरी ते विमानतळ मुंबईच्या नावानेच ओळखले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
- दोन आमदारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि अपक्ष आमदार महेश बालदी यांनी आज(21 जून) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नवी मुंबई येथे निर्माणाधीन असलेल्या विमानतळाला दिवंगत दि. बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला राज ठाकरे यांनी पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी या दोन आमदारांनी कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत. दि. बा. पाटील आणि बाळासाहेब ठाकरे या दोन्ही नावांच्या चर्चेवर पुर्णविराम देत. या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव देण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.