मुंबई - सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने 31 मार्च रोजी नागपूरमधील वकील सतीश उके ( Lawyer Satish Uke ) आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांनी ताब्यात घेतले होते. आज ( बुधवार ) मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात हजर केल्यानंतर उके बंधून 11 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली ( Satish Uke ED Custody Till 11 April ) आहे. त्यामुळे उके बंधूना मोठा धक्का मानला जात आहे.
कोट्यावधींचा भूखंड बळकावत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नागपूरमधील वकील सतीश उके आणि त्यांचे बंदू प्रदीप उके यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं 6 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज त्यांची कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी उके बंधूंच्या कोठडीत 11 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.