मुंबई :नागपंचमी (Nag Panchami 2022) हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील (Shravan Month) शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. देवतांच्या पूजेबरोबरच नागांच्या पूजेला नेहमीच महत्त्वाचे स्थान राहिले आहे. भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर झोपतात आणि भगवान शंकरांनी नागांना आपल्या गळ्यात धारण केले आहे. भगवान शिवभक्तांसाठी श्रावण महिना नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. या महिन्यात नागदेवता (Lord Snake) व भोलेनाथाची (Lord Shiva) विशेष पूजा केली जाते. नागपंचमी हा सण शुक्ल पंचमी तिथीला साजरा केला जातो. नागांच्या पूजेच्या या पवित्र सणाला हिंदू धर्मात (Hindu Religion) खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिवाच्या नाग देवतेचे पूजन (Nag panchami worship method and story)केले जाते. यावर्षी नागपंचमी सण 02 ऑगस्ट 2022 रोजी साजरा होणार आहे.
नागपंचमी पुजा-विधी(Nag panchami worship method and story) :नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. नागदेवतेला हळद, रोळी, तांदूळ, फुले अर्पण करून पूजा करावी. कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून सर्पदेवतेला अर्पण करा. यानंतर नागदेवतेची आरती करून नागदेवतेचे मनाने ध्यान करावे. शेवटी नागपंचमीची कथा नक्की ऐका. शनीची साडेसाती किंवा वक्र दृष्टी जर एखाद्या व्यक्तीवर असेल, तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध पाजावे. कारण शनि हा सापांचा कारक मानला जातो आणि भगवान शंकराच्या गळ्यात नाग असतो. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर धातूपासून बनवलेला नाग अर्पण केल्यास; शनि साडेसातीचा वाईट परिणाम होत नाही. शनिदेवाच्या महादशेमुळे आर्थिक किंवा कौटुंबिक समस्या असल्यास; शिवलिंगावर लोखंडाचा नाग अर्पण करावा आणि असे केल्यावर पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेकही करावा.
नागपंचमी सणा बाबतच्या पौराणिक कथा :
1. हिंदू पौराणिक कथेनुसार ब्रह्माजींचा मुलगा कश्यप याला चार बायका होत्या. त्याच्या पहिल्या पत्नीपासून देवता, दुसऱ्या पत्नीपासून गरुड आणि चौथ्या पत्नीपासून राक्षसांचा जन्म झाला असे मानले जाते. परंतु त्याची तिसरी पत्नी कद्रू, जी नागा वंशाची होती; तीने नागांना जन्म दिला. असे मानले जाते.