मुंबई - पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा ई - शपथ (ई - प्लेज) उपक्रम आयोजित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या 01 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दुरचित्रप्रणालीद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे व अन्य मंत्री दुरचित्रप्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत.
संकेतस्थळ -
माझी वसुंधरा या अभिनव उपक्रमाचे संकेतस्थळ majhivasundhara.in हे 01 जानेवारी 2021 रोजी सुरु होणार आहे. नवीन वर्षात पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी राज्यातील नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची किमान एक तरी शपथ घ्यावी, असे आवाहन करण्यात येणार आहे. ही शपथ घेण्यासाठी नागरिकांनी majhivasundhara.in या संकेतस्थळाला भेट देऊन #EPledge ला क्लिक करून शपथ घ्यावी. या संकेतस्थळावर शपथेचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पर्यायाव्यतिरिक्त नागरिकांना व्यक्तीगत पातळीवर अन्य कोणतीही शपथ घेता येऊ शकणार आहे. ही शपथ घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीस प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने पर्यावरण रक्षणासाठी शपथ घ्यावी, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून करण्यात आले आहे.
माझी वसुंधरा अभियान -
निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्चावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे. पृथ्वी तत्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण याबाबत काम करणे. वायु तत्वाचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायु प्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधार करणे. जल तत्वाशी संबंधित नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता करणे. अग्नी तत्वाशी संबंधित ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे, अपारंपारिक ऊर्जेच्या निमिर्तीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिन, शेतांचे बांध यासारख्या जागांचा उपयोग करून घेणे. तर आकाश या तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करून मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात जनजागृती करणे, या बाबींचा समावेश आहे.
स्वराज्य संस्थाना सोबत घेऊन उपक्रम -