मुंबई -नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर गंभीर आरोप लावत आहेत. एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईवरून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आम्ही एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपास्थित केले. आज पुन्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर त्यांचे जावई समीर खान यांना फसवल्याचा आरोप केला आहे. तसेच एनडीपीएस न्यायालयाच्या निर्णयावरून एनसीबीला तंबाखू आणि गांजा यातला फरक कळतो का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
'माझ्या परिवाराला सहन करावा लागला मानसिक त्रास' -
१३ जानेवारी २०२१ रोजी समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे २०० किलो ड्रग्ज सापडल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले होते. एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि प्रेस रिलीज समीर वानखेडे यांच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. एनडीपीएस न्यायालयाने समीर खान यांनी जामीन दिला. त्यांना साडेआठ महिने जेलमध्ये राहावे लागले. काल यासंदर्भातला निकाल आला आहे. यामध्ये गांजा सापडला नसल्याचे म्हटले आहे. मात्र, यामुळे माझ्या परिवाराला मोठा मानसिक त्रास झाला. माझी मुलगी मानसिक धक्क्यात होती. त्यांच्या दोन मुलांवरही परिणाम झाला, असेही ते म्हणाले.
'एका नंबरवरून एनसीबीकडून माहिती पुरवली गेली' -