महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'माय फर्स्ट वोट सेल्फी’ या निवडणूक आयोगाच्या उपक्रमात सामील व्हा; युवा मतदार दूत व्हा! - voting

निवडलेल्या १०० नवमतदारांना येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर जिल्हाचे ‘युवा मतदार दूत’ म्हणून नेमले जाईल. या १०० नवमतदारांमधूनही निवडक १० युवा मतदारांच्या छायाचित्राचे स्टँडीज त्या-त्या भागात आणि महाविद्यालयात उभारून युवा मतदारांना सन्मानित केले जाणार आहे.

माय फर्स्ट वोट सेल्फी

By

Published : Apr 20, 2019, 11:00 AM IST

मुंबई- मुंबई शहर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील १८ हजार मतदारांची नोंद आहे. या सर्वच मतदारांनी लोकसभा निवडणुकीत २९ एप्रिलला १०० टक्के मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुंबई शहरातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नवमतदारांसाठी ‘माय फर्स्ट वोट सेल्फी’ या उपक्रमाची घोषणा जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केली.

सेल्फी कुठे व कसा पाठवायचा?

जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या firstvoteselfie@gmail.com या ई-मेल अथवा ९३७२८३००७१ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावी. ही सेल्फी पाठवाताना संबंधित नवमतदाराने नाव, आडनाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव/नवमतदाराचे नाव/ईपीक नंबर किंवा मतदार यादी भाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांकाचा उल्लेख करावा. २९ एप्रिलला मतदान केल्यानंतर सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत एक सेल्फी घेऊन तो प्रशासनाला पाठवायचा आहे. हा सेल्फी मतदाराने मतदान केद्रांच्या १०० मीटर मर्यादेच्या बाहेर येवून काढावा.

जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे माहिती देताना

या स्पर्धेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून सुमारे १० मतदारांची निवड केली जाईल. मुंबई शहरातील कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, वरळी, शिवडी, वडाळा, सायन-कोळीवाडा, धारावी, माहीम या १० विधानसभा मतदारसंघातून एकूण १०० नवमतदारांची अंतिम निवड केली जाईल. निवडलेल्या १०० नवमतदारांना येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर जिल्हाचे ‘युवा मतदार दूत’ म्हणून नेमले जाईल. या १०० नवमतदारांमधूनही निवडक १० युवा मतदारांच्या छायाचित्राचे स्टँडीज त्या-त्या भागात आणि महाविद्यालयात उभारून युवा मतदारांना सन्मानित केले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details