मुंबई : मनसुख हिरेनप्रकरणी सचिन वझेंना तत्काळ निलंबित करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी रान उठविल्यानंतर याविषयी विचारणा केली असता 'आपला निर्णय म्हणजे एक घाव दोन तुकडे असतो, इथे तीन पक्षांचे सरकार आहे', असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले. त्यामुळे त्यांच्या विधानावरून विधान भवनात उलटसुलट चर्चा आता रंगताना दिसत आहेत.
'आपला निर्णय म्हणजे एक घाव दोन तुकडे, इथे तीन पक्षांचे सरकार' अजित पवारांच्या विधानाने चर्चांना उधाण
'आपला निर्णय म्हणजे एक घाव दोन तुकडे असतो, इथे तीन पक्षांचे सरकार आहे', असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले. त्यामुळे त्यांच्या विधानावरून विधान भवनात उलटसुलट चर्चा आता रंगताना दिसत आहेत.
अजित पवारांच्या विधानामुळे नव्या चर्चा
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्पोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी हिरेन यांच्या पत्नी विमल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, सचिन वझे हेच हिरेन यांच्या मृत्युस कारणीभूत आहेत. त्यामुळे वझेंना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. या मुद्द्यावरून विधानसभेचे कामकाज तब्बल आठ वेळा तहकूब झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी विचारले असता, 'आपला निर्णय एक घाव दोन तुकडे असतो, इथे तीन पक्षांचे म्हणजेच महाविकास आघाडीचे सरकार आहे', असे ते म्हणाले. अजित पवार यांनी केलेल्या या विधानामुळे महाविकास आघाडी सरकारच्या गोटात नाराजी असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे. तीन पक्षांच्या सरकारमुळे निर्णय प्रक्रीयेत अडथळे येत असल्याविषयीची नाराजी अजित पवारांच्या विधानातून दिसत असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.
हेही वाचा -सचिन वाझे प्रकरणी गृहमंत्री देशमुख विधानपरिषदेत करणार निवेदन