महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MVA Leaders Meeting : विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची होणार संयुक्त बैठक - उपमुख्यमंत्री अजित पवार

शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतली असून सर्व आमदारांना पवईतील वेस्ट इन हॉटेल येथे ठेवण्यात आले आहेत. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत दाखल होणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदारही आज मुंबईत येणार आहेत. सायंकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार आहे.

MVA Leaders Meeting
महाविकास आघाडीचे नेते

By

Published : Jun 18, 2022, 3:03 PM IST

मुंबई -विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांची आज सायंकाळी मुंबईत बैठक पार पडणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात पार पडणाऱ्या बैठकीत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल परब हे नेते सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसकडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सहभागी होतील.

शिवसेनेचे आमदार वेस्ट इन हॉटेलमध्ये - शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतली असून सर्व आमदारांना पवईतील वेस्ट इन हॉटेल येथे ठेवण्यात आले आहेत. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत दाखल होणार असून त्यांची सोय मुंबईच्या टायटन हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. काँग्रेस आमदारांची निवडणुकीपर्यंत राहण्याची सोय फोर सिझन हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीला लागणार मतांची गरज -विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने उभे केलेले आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठीची मते शिवसेनेकडे आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला अद्यापही तीन मतांची गरज भासणार आहे. त्यातच काँग्रेसला जवळपास दहा मतांची गरज लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सोबत असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details