मुंबई -गोवंश हत्याबंदीनंतर बकरी ईदसाठी राज्यात ऊंटांच्या कत्तलीसाठी कायद्यात दुरुस्ती करून वर्षभर उंटांची कत्तल कायदेशीर करावी, उंटपालन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. उंट बंदीमुळे मुस्लीम समुदायावर विपरीत परीणाम होतो. बकरी ईद आणि संपूर्ण वर्षात जनावरांचे बळी देऊ शकत नाही. यामुळे सामाजिक कार्यकर्ते फारूक धाला आणि इरफान माछीवाला यांनी ही मागणी केली आहे.
उंटांच्या प्रजननामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. उंटांच्या पैदाशीमुळे जातीय सलोखा वाढेल. शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल आणि आत्महत्येचे प्रमाण खाली येईल. उंट कत्तल कायदेशीर करण्यासाठी कायद्यात बदल करुन हस्तक्षेप करून तोडगा काढण्यासाठी मुस्लीम सामाजिक संघटनानी महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती केली आहे. त्यानुसार संपूर्ण वर्ष आणि बकरीईदला उंट कत्तल करण्यास परवानगी देण्यास स्थानिक संस्थांना सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारने उंटांसाठी कत्तलखान्यांची स्थापना करण्याचा विचार करावा. महाराष्ट्रातील आर्थिक वाढ आणि शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळवण्याची संधी मिळेल. उंट निर्यातीत चांगला वाव आहे, असे ही या सामाजिक मुस्लीम संघटनानी म्हटले आहे.