मुंबई- संपूर्ण जगामध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे. आज भारतामध्ये विविध राज्यांमध्ये योग दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. मुंबईमध्ये सुद्धा अशाच एका अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ भाजपचे नगरसेवक अतुल शहा यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आज सकाळीच मुस्लिम युवतींनी बुरख्या मध्ये योगा केला आहे. यामार्फत वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न तरुणींनी केला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या 177 देशांचा पाठींबा
गेल्या कित्येक दशकांपासून भारताची ओळख असलेल्या योग साधना आता आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्राने 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून घोषित केला. संयुक्त राष्ट्राच्या 177 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यासह 21 जून हा जागतिक 'योग दिन' म्हणून साजरा केला जात आहे.