मुंबई - कुर्ला नेहरू नगर परिसरात रविवारी रात्री घरात घुसून एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जरीना अनवर शेख(वय 60) असे या महिलेचे नाव असून, ती वर्षा आदर्श सोसायटीमधील अनवर पवार बिल्डिंग जागृती नगर कुर्ला येथे राहत होती.
मुंबईत वृद्ध महिलेची घरात घुसून हत्या; गुन्हा दाखल
नेहरू नगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदवला आहे. अज्ञात कारणावरुन शस्त्राने महिलेच्या चेहऱ्यावर वार करून महिलेला गंभीर जखमी केले. त्यानंतर औषधोपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे.
दरम्यान, रविवारी रात्री दीडच्या सुमारास जरीना यांच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने रात्री येऊन शस्त्राने त्या महिलेवर वार केले. तसेच तिच्या गळ्यातील सर्व दागिने व घरातील काही वस्तू असा एकूण पाच लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. जरीना या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांची मुलगी त्यांच्या घरी येऊनजाऊन देखभाल करत असे.
नेहरू नगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदवला आहे. अज्ञात कारणावरुन शस्त्राने महिलेच्या चेहऱ्यावर वार करून महिलेला गंभीर जखमी केले. त्यानंतर औषधोपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे. या गुन्ह्याचा पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती नेहरू नगर पोलिसानी सांगितले. या घटनेसंदर्भात शेजारील नसीम आपा यांनी माहिती दिली आहे.