मुंबई - मुंबईच्या कुर्ला ( Kurla ) परिसरामध्ये असलेल्या एचडीआयएल कंपाऊंडमधील ( HDIL Compound ) एका बंद इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रूममध्ये एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. ही तरुणी आपल्या दोन मित्रांसोबत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शूट करण्यासाठी याठिकाणी गेली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल -
कुर्ला परिसरातील एचडीआयएल कंपाऊंडमध्ये या तरुणीचा मृतदेह आढळून आला. कंपाऊंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर हा मृतदेह सापडल्यानंतर तातडीने राजावाडी रुग्णालयात ( Rajawadi Hospital ) पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसून आसपासच्या पोलीस स्थानकांमध्ये बेपत्ता असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत का, याचीही खातरजमा पोलीस करत आहेत.