क्रूरतेची परिसीमा.. तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या चिमुकलीला खाडीत जिवंत पुरले - तीन महिन्याच्या मुलीला जिंवत पुरले
मुलगी झाली म्हणून एक तृतीयपंथीय बक्षीस मागण्यासाठी गेला. मात्र मुलीच्या पालकांची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी किन्नरला पैसे देण्याबाबत असमर्थता दर्शवली. याचा राग मनात धरून किन्नर व त्याच्या पुरुष मित्राने तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण केले व खाडीत जिवंत पुरले.
![क्रूरतेची परिसीमा.. तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या चिमुकलीला खाडीत जिवंत पुरले transgender murder of girl](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12405363-thumbnail-3x2-murder.jpg)
मुंबई - मुलगी झाली म्हणून एक तृतीयपंथीय बक्षीस मागण्यासाठी गेला. त्यांनी मुलीच्या पालकांकडे एक साडी, एक नारळ आणि अकराशे रुपयांची मागणी केली. गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा किन्नर बक्षीस मागण्यांसाठी घरी गेला होता. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे या तृतीयपंथीयांची मागणी मुलीचे पालक पूर्ण करू शकले नाहीत आणि याचा राग मनात धरून तृतीयपंथी तिथून निघून गेला.
त्यानंतर मध्यरात्री 2 ते 3 च्या सुमारास आपला जोडीदार सोनू ( तृतीयपंथीयाचा पुरुष मित्र) याला सोबत घेऊन किन्नर पुन्हा त्या घरात गेला व तीन महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण केले. अपहरण करून चिमुकलीला कफ परेड येथील आंबेडकर नगरच्या मागील खाडीत जिवंत पुरले. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि तात्काळ प्रभावाने या अटक केली.