मुंबई -नराधम चालकाने डॉक्टरच्या मुलीसह तिच्या आई आणि बहिणीचाही खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना कांदीवलीतील ( Kandivali Crime ) दळवी रुग्णालयात आज सकाळी उघडकीस आली. किरण दळवी, मुस्कान दळवी आणि भूमी दळवी असे नराधमाने खून केलेल्या मायलेकींची नावे आहेत. तर तिघींचा खून केल्यानंतर नराधम चालकानेही आत्महत्या ( killed ) केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
कांदिवलीतील दळवी रुग्णालयात आढळून आले चार मृतदेह - आज सकाळी कांदिवलीतील दळवी रुग्णालयात ( hospital ) चार मृतदेह आढळून आल्याने परिसरात हाहाकार उडाला होता. घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलीस ( Kandivali Police ) ठाण्यातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शीव दयाल सेन यांचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहांना पुढील उत्तरीय कारवाईसाठी रुग्णालयात हलवण्यात आले.