महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bihar Murder Accused Arrest: बिहारच्या माजी नगरसेविकेच्या पतीच्या हत्येप्रकरणी जुहूतून दोघांना अटक - Bihar Murder Accused Arrest

खुनाचा गुन्हा दाखल असलेले बिहार येथील दोन आरोपी मुंबईत येणार असल्याची माहिती मिळताच जुहू परिसरात सापळा रचून गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime) गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात (murder accused of bihar arrested) घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. (Bihar Murder Accused Arrest) (Laterst news from Mumbai)

Bihar Murder Accused Arrest
Bihar Murder Accused Arrest

By

Published : Oct 16, 2022, 7:43 PM IST

मुंबई : खुनाचा गुन्हा दाखल असलेले बिहार येथील दोन आरोपी मुंबईत येणार असल्याची माहिती मिळताच जुहू परिसरात सापळा रचून गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime) गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात (murder accused of bihar arrested) घेतले.आरोपी सनतकुमार जयकुमार सिंग ऊर्फ शुभम सिंग (२२) आणि सोनू कुमार विनय भारती ऊर्फ शुभम गिरी (१९) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. (Bihar Murder Accused Arrest) (Laterst news from Mumbai)

आरोपीविरुद्ध यापूर्वीही खूनाचा गुन्हा -बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील अंबा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हे दाखल असून त्यांचा शोध सुरू होता. हे दोघे आरोपी मुंबईत येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून शुभम सिंग (२२), शुभम गिरी (१९) या दोन्ही आरोपींना पकडण्यात आले. यातील आरोपी शुभम सिंग याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात तो जामिनावर मुक्त झाला आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी अंबा पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांना आरोपी पकडल्याचे कळवले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. बिहार येथील औरंगाबाद जिल्ह्यातील अंबा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३०७, ३४सह भारतीय हत्यार कायदा २७ या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे मुंबईत येणार असल्याबाबतचे माहिती पोलिस निरीक्षक काठे यांना विश्वासू बातमीदारामार्फत प्राप्त झाली आणि त्यानुसार जुहूत सापळा रचून दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले.

बिहारमध्ये हत्या करून मुंबईत पळून आले -५ ऑगस्ट रोजी बिहार येथे औरंगाबाद जिल्ह्यात अटक आरोपींनी मोटार सायकलवरून घरी जात असताना पूर्ववैमानस्यातून नवीन नगर रोड येथे गोळीबार करून सुजित कुमार मेहता यांना जीवे ठार मारले होते. या प्रकरणी सुजित कुमार मेहता यांची पत्नी सुमन कुमारी यांनी अंबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुमन कुमारी सुजित कुमार मेहता या माजी नगरसेविका आहेत. आरोपी शुभम सिंग आणि शुभम गिरी यांच्या विरोधात 2017 मध्ये टाऊन ठाणा पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल असून 2022 मध्ये मोहम्मदगंज पोलीस ठाण्यात हत्यार बंदी कायदा अन्वये गुन्हा तर 2021 मध्ये टाऊन ठाणा पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी 363 अन्वये एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details