मुंबई - साकीनाका येथील सत्यनगर येथे पालिका पाणी खात्याचे अधिकारी आणि काँग्रेसचे नगरसेवक वाजिद कुरेशी यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. कुरेशी यांनी पालिका कर्मचाऱ्यांना काही काळ एकाच ठिकाणी रोखून धरले होते. अखेर साकीनाका पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.
पाण्याचा दाब कमी करण्यास स्थानिकांचा विरोध, पालिका कर्मचाऱ्यांना रोखून धरले - water pressure
साकीनाका येथील सत्यनगर येथे जलवाहिनीमधील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी करण्यासाठी गेले असता, पालिका कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिक आणि नगरसेवक कुरेशी यांनी विरोध केला.अखेर साकीनाका पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.
पालिकेने जरीमरी या विभागामध्ये पाण्याची होणारी मोठी समस्या लक्षात घेता, एक 12 इंचाची जलवाहिनी या ठिकाणावरून टाकली होती. या वाहिनीमधला पाण्याचा दाब कमी करण्यासाठी करण्यासाठी गेले असता, पालिका कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिक आणि नगरसेवक कुरेशी यांनी विरोध केला.
या विभागामध्ये पाण्याची समस्या आहे, हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. तरीही, पालिका अधिकारी मुद्दाम कोणाच्या तरी दबावाखाली काम करताना दिसत आहेत. त्यामुळे अखेर हा विरोध करावा लागला, अशी प्रतिक्रिया कुरेशी यांनी दिली.