महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी "सोनी"ला पालिकेची नोटीस, कंपनीला बांधकाम नियमित करण्यासाठी दिली मुदत - सोनीला पालिकेची नोटीस

मुंबई महापालिकेने सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यामध्ये कंपनीला बांधकाम नियमित करण्यासाठी मुदतही देण्यात आली आहे.

बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी "सोनी"ला पालिकेची नोटीस
बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी "सोनी"ला पालिकेची नोटीस

By

Published : Apr 28, 2022, 9:17 PM IST

Updated : Apr 28, 2022, 9:29 PM IST

मुंबई - बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात पालिकेने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेने सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यामध्ये कंपनीला बांधकाम नियमित करण्यासाठी मुदतही देण्यात आली आहे.

बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी "सोनी"ला पालिकेची नोटीस

बेकायदेशीर बांधकामाला नोटीस -मालाड पश्चिम येथील लिंक रोडवर सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची इमारत आहे. इंटरफेस 7 या इमारतीमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या मजल्यावर बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचा आरोप आहे. बांधकामाची परवानगी देताना जी मान्यता देण्यात आली आहे, त्यापेक्षा इतर काम केले आहे. यामुळे हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे पालिकेने म्हटले आहे. एमआरटीपीच्या 44 व्या कलमान्वये एका महिन्यात हे बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करावा, अन्यथा हे बांधकाम पालिका तोडेल अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी "सोनी"ला पालिकेची नोटीस
अन्यथा तोडक करवाई - बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी आम्ही सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला नोटीस दिली आहे. एक महिन्याचा त्यांना कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत त्यांना ते बांधकाम नियमित करण्यासाठी प्रस्ताव देण्यास सांगितले आहे. एका महिन्यात तसा प्रस्ताव आला नाही तर ते बेकायदेशीर बांधकाम पालिका तोडून टाकेल. त्याचा खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल अशी माहिती पी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिली आहे.
Last Updated : Apr 28, 2022, 9:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details