महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Municipal Bank Donates CMRF : महापालिका कर्मचारी बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १५ लाखांची देणगी

८० हजारांपेक्षा अधिक सभासद असलेल्या दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे (The Municipal Co. Op. Bank Limited, Mumbai) मुख्यमंत्री सहाय्यता निधीला (Chief Minister Relief Fund) रुपये १५ लाखांची देणगी देण्यात आली. याबाबत १५ लाखांची ‘पे ऑर्डर’ आज महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल (Iqbalsinh Chahal) यांना देण्यात आली.

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक
बँकेच्या संचालक मंडळाद्वारे रुपये १५ लाखांची ‘पे ऑर्डर’ आज महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना सुपूर्द करण्यात आली.

By

Published : Dec 8, 2021, 3:38 PM IST

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कर्मचाऱ्यांच्या सुखादुःखात आर्थिकदृष्ट्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आणि अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या `दि म्युनिसिपल को. ऑप. बँक लिमिटेड, मुंबई`(The Municipal Co. Op. Bank Limited, Mumbai) या महापालिका कर्मचाऱ्यांच्या बँकेद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला (Chief Minister Relief Fund) रुपये १५ लाखांची देणगी देण्यात आली आहे. या अनुषंगाने बँकेच्या संचालक मंडळाद्वारे रुपये १५ लाखांची ‘पे ऑर्डर’ आज महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना सुपूर्द करण्यात आली आहे. याप्रसंगी बँकेचे कार्याध्यक्ष तथा उपायुक्त विश्वास शंकरवार, उप कार्याध्यक्ष तथा उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळातील सदस्य आणि संबंधीत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

८० हजारांपेक्षा अधिक सभासद
बँकिंग क्षेत्रातील `बँकिंग फ्रंटीअर्स' (Banking Frontiers) यासारख्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि. ही महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये कर्मचारी गटातील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक बँक आहे. या बँकेचे सुमारे ८० हजारांपेक्षा अधिक सभासद असून सुमारे १० हजार इतके नामधारी सभासद आहेत. ही बँक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वागीण आर्थिक गरजा भागविण्यासाठी कार्यरत आहे. या बँकेद्वारे महापालिका कर्मचाऱ्यांना कर्ज सुविधा, तर नागरिकांना विविध स्तरीय बँकींग सुविधा अत्यंत उत्तमरित्या देण्यात येतात.

कर्मचाऱ्यांसाठी बँकिंग सेवा
महापालिका कर्मचाऱ्यांच्या या सहकारी बँकेद्वारे ऑनलाईन बँकींग, कोअर बँकींग, आर.टी.जी.एस., एन.इ.एफ.टी., पॉस इत्यादी सुविधा देखील ग्राहकांना देण्यात येतात. ही बँक रुपे कार्डसची सभासद असून, बँकेचे मुंबई व उपनगरात विविध ठिकाणी स्वतःची ए.टी.एम. केंद्रे आहेत. बँकेने मोबाईल पेमेंट सेवा देखील सुरू केली आहे. तसेच या बँकेने एखाद्या खासगी बँकेसारखीच अद्ययावत टेक्नॉलॉजीवर आधारित बँकींग सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिली असल्याचे बँकेचे असल्याचे महाव्यवस्थापक विनोद रावदका यांनी सांगितले आहे. तसेच उत्कृष्ट नियोजन आणि कर्ज वसुलीसाठी केलेला सततचा पाठपुरावा यामुळे ग्रॉस एन.पी.ए. चे प्रमाण देखील अत्यंत कमी असल्याचेही रावदका यांनी या निमित्ताने नमूद केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details