मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर टीका करणारे भाजपचे नेते मोहित कंबोज ( BJP Leader Mohit Kamboj ) यांना पालिकेने नोटीस दिली होती. त्यानंतर आज इमारतीमध्ये बुधवारी दुपारी बारा वाजता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी ( Municipal Team Inspected Mohit Kamboj Building ) केली. या तपासणीदरम्यान कोणते बेकायदेशीर बांधकाम आढळून आले, याचा अहवाल बवण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार कंबोज यांना महापालिकेकडून नोटीस दिली जाणार ( BMC Action Against Illegal Construction ) आहे.
पालिकेकडून तपासणी - मुंबई महापालिकेच्या एच वेस्ट कार्यालयाने सांताक्रूझ पश्चिम येथील खुशी प्राईड बेलमोंडो बिल्डिंगला नोटीस बजावली आहे. या इमारतीमध्ये भाजपा नेते मोहित कंबोज राहतात. पालिकेच्या कलम 488 नुसार ही नोटीस देण्यात आली आहे. 23 मार्चला किंवा त्यानंतर इमारतीमध्ये काही बेकायदेशीर बांधकाम झाले आहे का याचे मोजमाप घेऊन तपासणी केली जाईल असे असे नोटीसीत म्हटले होते. इमारतीमधील अध्यक्ष, सेक्रेटरी, घर मालक आदींनी त्यांना बांधकामाला दिलेल्या परवानगी आणि नकाशे यांची प्रत सोबत ठेवावी असे नोटिसीमध्ये म्हटले होते.