महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सिद्धिविनायक मंदिराजवळील अनधिकृत दुकानांवर पालिकेचा हातोडा - मुंबई

शहरातील सिद्धिविनायक मंदिराबाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेने कारवाई केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

शहरातील सिद्धिविनायक मंदिराबाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेने कारवाई केली.

By

Published : Jul 26, 2019, 6:43 PM IST

मुंबई - शहरातील सिद्धिविनायक मंदिराबाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेने कारवाई केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

प्रभादेवी येथे सिद्धिविनायक मंदिरात हजारो भाविक दर्शनाला येत असतात. हे भाविक मंदिराशेजारील दुकानांमधून पूजेचे साहित्य विकत घेतात. यामुळे मंदिराच्या बाजूलाच पूजेचे व इतर साहित्य विकणारी दुकाने बांधण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना अडथळे येत होते.

शहरातील सिद्धिविनायक मंदिराबाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेने कारवाई केली.

याबाबत भाविकांनी पालिकेला तक्रार केल्यानंतर पालिकेने दुकाने हटवण्यासाठी पोलिसांना पत्र लिहिले होते. पोलिसांनी याबाबत आढावा घेऊन पालिकेला अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार पालिकेने मंदिराशेजारी २० दुकाने पाडली आहेत. भाविकांना होत असलेल्या त्रासामुळे ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details