मुंबई- खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणी थांबताना दिसत नाही आहे. मुंबई महानगरपालिकेने आता खार येथील निवासस्थानी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली ( BMC Notice to Rana Couple ) आहे. इमारतीत अनधिकृत बांधकाम केल्याचा ( Rana Illegal Construction ) पालिकेला संशय असल्याने ही नोटीस लावण्यात आली आहे. 4 मे रोजी पालिकेचे अधिकारी घराची पाहणी करणार आहे. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. राणा दाम्पत्याला मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठन ( Hanuman Chalisa Reading ) करण्याच्या आग्रहानंतर अटक करण्यात आली. मात्र अजूनही त्यांना जामीन मिळाला नाही. ते दोघेही सध्या तुरूंगात आहे.
तुरूंगातील मुक्काम वाढला - मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. त्याबाबची सुनावनी काल न्यायालयात पार पडली. राणा दाम्पत्याचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. 4 मे रोजी आता त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शनिवार राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली होती. तेव्हा देखील न्यायालयाने मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत निकाल राखून ठेवला होता. काल ( 2 मे ) त्यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी झाली. मात्र, वेळेअभावी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे उद्या ( बुधवार ) पर्यंत त्यांच्या कोठडीतील मुक्काम वाढला आहे.