मुंबई - दसरा मेळावा आणि शिवसेना याचे अतूट नाते आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होणार आहे. पालिकेकडे रीतसर परवानगी मागितली आहे. पालिका आम्हाला परवानगी देईल अशी अपेक्षा आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये असे वाटतं असेल तर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी शिवाजी पार्क वरील मेळाव्याला परवानगी द्यावी (allow Dussehra Melava at Shivaji Park), असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. तसेच नारायण राणे यांनी कोर्टाचा निकाल खिलाडू वृत्तीने घ्यावा असे आवाहन करत कोर्ट मॅटरमध्ये कोणीही दबाव टाकतील असे वाटत नसल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे (appeals Kishori Pednekar).
कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून परवानगी द्या -शिवसेनेची भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठरवतात. त्यांनी दसरा मेळावा शिव तीर्थावर होणार हे आधीच स्पष्ट केले आहे. एक नेता, एक पक्ष, एक झेंडा, एक मैदान हे समीकरण आहे. हे समीकरण आता बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोंडी केली जात आहे. पण मला खात्री आहे परवानगी मिळेल. परवानगी नाकारताना त्यांना कारणे द्यावी लागतील. परवानगी नाकारली तर हे महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता बघते आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये या मताचे आम्ही आहोत. मात्र जुनी शिवसेना कुठे आहे हे बघायची अनेकांना खुमखुमी आहे. ती खुमखुमी शिवसैनिक दाखवतील. कायदा सुव्यवस्था बिघडू नये असे वाटतं असेल तर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी शिवाजी पार्कवरील मेळाव्याला परवानगी द्यावी असे आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.